ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव








ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

अकोला, दि. 29 : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय माळी महासंघातर्फे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा  येथील प्रमिलाताई ओक सभागृहात आज झाला. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी झाला.

शंकरराव गि-हे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, माजी आमदार बळीराम शिरस्कार, संतोष शिवरकर, जयंत मसने, सुभाष सातव, गणेश काळपांडे, ॲड. प्रकाश दाते, मनोहर उगले, प्रा. अशोक राहाटे, संजय तडस, ललित काळपांडे, वनिताताई राऊत, महेश गणगणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

मंत्री श्री. गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाकडून अनेकविध कामांना गती मिळाली आहे. संत शिरोमणी सावता माळी यांच्या समाधी मंदिर व परिसराचा विकास करण्यासाठी शिखर समितीची मान्यता झाली असून, हे कार्य लवकरच पूर्ण होईल. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म गावी (नायगाव, जि.सातारा)  स्मारक उभारण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून हेही काम गुणवत्तापूर्ण व गतीने उभारण्यात येईल. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा