आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त शनिवारी कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त
शनिवारी कार्यक्रम
अकोला, दि.२० : आंतरराष्ट्रीय
योगदिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे दि. २१ जून रोजी सकाळी ७ वा. डॉ. पंजाबराव
देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात कार्यक्रम होणार आहे. यावेळी खेळाडू,
योगप्रेमी व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट
यांनी केले आहे.
युवा भारत केंद्र, अजिंक्य
फिटनेस पार्क, दिव्यांग सामाजिक संस्था, एनसीसी, स्काऊट-गाईड, होमगार्ड, पतंजली योग
समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, योगभारती, क्रीडाभारती, योग परिषद, योगासन व सांस्कृतिक मंडळ,
विश्वमांगल्य सभा, संत निरंकारी मंडळ, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, वाहे गुरू सेवा समिती,
स्वामी श्री झुलेलाल वाटिका, सिंधु ज्येष्ठ नागरिक मंडळ यांचे उपक्रमाला सहकार्य आहे.
व्यक्तीच्या शारीरिक व
आत्मिक विकासासाठी योगविद्या लाभदायक असून, त्याचा प्रसार ही सर्वांची जबाबदारी आहे.
त्यामुळे अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा