जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता पाचवीसाठी प्रवेश सुरु
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता पाचवीसाठी प्रवेश सुरु
अकोला, दि. ५ : जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ करीता
इयत्ता पाचवीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने दि. २९ जुलैपर्यंत करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे
प्राचार्य आर.एस. चंदनशिव यांनी केले आहे.
विद्यार्थी जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये
इयत्ता पाचवीमध्ये शिकलेला असावा, विद्यार्थी-विद्यार्थीनी इयत्ता तिसरी व चौथी पूर्ण
शैक्षणिक सत्र सलगपणे सरकारमान्य शाळेतून उत्तीर्ण असावा, तसेच विद्यार्थ्यांचे इयत्ता
पाचवीचे पुर्ण शैक्षणिक सत्र अकोला जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत झालेला असावे, विद्यार्थ्यांचा
जन्म दि. 1 मे 2014 ते दि. 31 जुलै 2016 (दोन्ही दिवस धरुन) या कालावधीत झालेला असावा.
पालकांनी शाळेच्या मुख्याधापकांच्या सही शिक्क्यानिशी माहिती भरलेले
फार्म आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेवून ऑनलाईन
प्रवेश अर्ज करावा. प्रवेशासंबंधी माहितीकरीता
https://cbseitms.rcil.org.in/nvs/Index/Registration या संकेतस्थळाव पाहावे. तसेच
अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय बाभूळगांव जहॉ.,अकोला येथे किंवा 0724
2991087 वर संपर्क साधावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा