राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व शिबिरात १५१ जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण

 

राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व

शिबिरात १५१ जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण

अकोला, दि. २६ : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष त्रुटी पूर्तता शिबिरे घेण्यात येत आहेत. त्यात चालू आठवड्यात झालेल्या शिबिरांमध्ये १५१ जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सामाईक परीक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे नव्याने अर्ज करणा-यांसाठी विशेष खिडकीचेही नियोजन करण्यात आले. पूर्वी अर्ज केलेल्या व त्रुटी असलेल्या अर्जदारांना ई-मेल, एसएमएसद्वारे कळविण्यात आले व शिबिरात पूर्तता करून घेण्यात आली.

पुढील शिबिर दि. १ जुलै रोजी कार्यालयात होणार असून, संबंधितांनी उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करून घ्यावी व प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, सदस्य व उपायुक्त अमोल यावलीकर, सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा