दिंडीद्वारे समतेचा जागर सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम; गुणवंतांचा सत्कार, प्रमाणपत्र वाटप




 

 

सामाजिक न्याय दिन

दिंडीद्वारे समतेचा जागर; गुणवंतांचा सत्कार, प्रमाणपत्र वाटप

अकोला, दि २६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त समता दिंडीद्वारे प्रबोधन व जनजागृती करण्यात आली.

समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सामाजिक न्यायभवन येथून समता दिंडीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी तुषार जाधव, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गोपाल वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक दादाहरी वणवे, समाज कल्याण निरीक्षक उमेश वाघ,शैलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी, समतादूत,समाजकार्य महाविद्यालय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी : आ.साजिदखान पठाण

दिंडीनंतर सामाजिक न्यायभवनात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. आमदार साजिदखान पठाण, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मारोती वाठ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी तुषार जाधव,समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य केशव गोरे, डॉ.निर्मला भोमोदे, अभिमन्यू सावदेकर,जे.पी सावंत, रामकृष्ण डोंगरे आदी उपस्थित होते.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप यावेळी लाभार्थींना करण्यात आले. विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवर, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

राजर्षी शाहू महाराज यांनी सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा करून सर्व जातिधर्माच्या मुला-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक संस्था, वसतिगृहे उभारली. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार श्री. पठाण यांनी यावेळी केले.

 

 ०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा