जात पडताळणी कार्यालयाच्या वतीने विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व

 

 

जात पडताळणी कार्यालयाच्या वतीने

विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन

 राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व

 

अकोला, दि. १७ : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जून ते २ जुलै दरम्यान "राजर्षी शाहु महाराज जयंती पर्व" राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि. २० जून व २४ जून रोजी विशेष त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरी करण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सामाजिक न्याय दिनानिमीत्ताने विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. सामाईक परीक्षेचा २०२५ चा निकाल जाहिर झाला आहे. सामाईक परिक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याकरिता अर्ज सादर केले नसेल त्यांच्याकरिता "अर्ज स्विकृतीसाठी विशेष खिडकीचे नियोजन" केले आहे. तसेच विशेष त्रुटी पुर्तता शिबीर दि. २० जून आणि २४ जून रोजी शिबिर होणार आहे.

अर्जदारांना त्रुटी ईमेल व एसएमएस तसेच पत्राव्दारे कळविण्यात आले आहे. तरी सदर शिबीराचा सर्व अर्जदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष जितेंद्र काकुस्ते, उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव मनोज मेरत यांनी केले आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा