आदिवासी मुला मुलींच्या वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
आदिवासी मुला मुलींच्या वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
अकोला, दि. २३: आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृह क्रमांक 1 व 2 मध्ये शैक्षणिक वर्ष 2025–26 साठी इयत्ता 11वी, डिप्लोमा, पदवी, व्यावसायिक अभ्यासक्रम व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुणवत्तेनुसार रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट, तसेच आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतीगृहात कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले आहे. अर्जासोबत महाविद्यालयाचा बोनाफाईड, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार व बँक तपशील आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जात कुटुंबातील मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे. आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह जुने वसतीगृह क्र.1, तोष्णेवाल ले-आउट, नवीन वसतीगृह क्र. 2, दामले मार्केट, आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह जुने क्र. 1, कौलखेड, वसतीगृह जुने नवीन क्र. 2, कौलखेड, येथे अर्ज सादर करावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा