अनु. जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान जिल्ह्यात २.२१ कोटींची तरतूद योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर विशेष मेळावे ‘एसएओं’ची माहिती
अनु. जाती आणि जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी
अनुदान
जिल्ह्यात २.२१ कोटींची तरतूद
योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर विशेष मेळावे
‘एसएओं’ची माहिती
अकोला,दि. 19: राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’
या
योजनेत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतक-यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुदान दिले
जाते. योजनेच्या अंमलबजावणीसाठी सहायक कृषी अधिका-यांमार्फत विशेष मेळावे व मोहिम राबविण्यात
येत आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी दिली.
योजनेत जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी २ कोटी व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी
२१ लक्ष रू. असा लक्षांक आहे. सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर
अर्ज करावेत.
जास्तीत-जास्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी लाभ
घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
योजनेत ठिबक व तुषार संचाची खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा