सुमारे अडीच हजार कोटी रू. निधीतून विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन

 

सुमारे अडीच हजार कोटी रू. निधीतून

विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन

अकोला, दि. 9 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. 11 जून रोजी सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक निधीतून जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण कार्यक्रम नियोजित आहे.  

 

पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्प भुमीपूजन समारंभ (454.62 कोटी), पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला इमारतीचा कोनशिला समारंभ (249.41 कोटी), अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत केंद्रशासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत मलनि:सारण (टप्पा-1) चे काम भुमीपूजन समारंभ (629.06 कोटी), अकोला महानगरपालिका क्षेत्रांतर्गत प्रधानमंत्री इ-बस सेवा योजना अंतर्गत महापालिकेचा ई-बसडेपो व चार्जिंग स्टेशनचे उभारणी करण्याचे काम – भूमीपूजन (18.99 कोटी), हायब्रीड अॅन्युटी कार्यक्रम अंतर्गत मुर्तिजापूर-दहीगाव-गुडधी-उमरी- अकोला राज्यमहामार्ग 284 वरील कि.मी. 0/00 ते 36/00 महामार्गाची सुधारणा करणे, अकोला-मलकापूर-कानशिवनी-मोरगांव काकड-बोरगांव खुर्द जिल्हा प्रमुख मार्ग क्र. 19 वरील कि.मी. 0/00 ते 24/500 महामार्गाची सुधारणा करणे - भूमीपूजन समारंभ (410.10 कोटी), हायब्रीड अॅन्युटी कार्यक्रम अंतर्गत उकळी बाजार-नेर-नांदखेड- किनखेड राज्यमहा मार्ग 278 वरील कि.मी. 63/00 ते 79/00 किनखेड ते दहीहांडा महामार्गाची सुधारणा करणे (97.37 कोटी), अकोट मतदार संघातील राज्यमार्ग क्र.47 रावेर, पातूर्डा, पिंपळगाव, खांडवी, जळगाव जामोद हिवरखेड अकोट या मार्गावरील (रंभापूर ते हिवरखेड ते वारखेड भाग) साकळी क्र. 116/600 ते 156/000 चे हायब्रीड अॅन्युटी अतंर्गत (311.44 कोटी), अकोला येथे पोलीस अधिकारी / कर्मचारी करिता दक्षता नगर येथे 246 निवास स्थाने व परिसर विकास कामे कोनशिला (129.23 कोटी), अकोला तहसिल तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोलाचे नविन प्रशासकीय इमारतीचे काम- लोकार्पण समारंभ (12.05 कोटी), अकोला तालुका क्रिडा संकुल बांधकाम कोनशिला समारंभ (5 कोटी), अकोला शहरातील अद्यावत सांस्कृतिक भवनाचे बांधकाम - कोनशिला समारंभ (15 कोटी), अकोला शहरातील ऑलम्पिक दर्जाचे जलतरण तलावाचे बांधकाम- कोनशिला समारंभ (9.96 कोटी), अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयातील नविन वार्ड इमारतीचे बांधकाम- भूमीपूजन समारंभ (151.56 कोटी), अकोला येथे महिला व बालविकास भवन इमारतीचे बांधकाम- लोकार्पण समारंभ (6.50 कोटी), जिल्हाधिकारी कार्यालय नविन इमारत- लोकार्पण समारंभ (8.29 कोटी), अकोला शहर व अकोट शहर येथील सीसीटिव्ही प्रकल्प - लोकार्पण समारंभ (9 कोटी), बार्शिटाकळी शहरातील मुख्य रस्त्याचे बांधकाम करणे - भूमीपूजन समारंभ (9.99 कोटी), 33/11 के.व्ही. हिवरा कोरडे उपकेंद्र ता. मुर्तिजापूर भूमिपूजन समारंभ (3.20 कोटी), 33/11 के.व्ही. पारद उपकेंद्र, ता. मुर्तिजापुर भूमीपूजन समारंभ (3.28 कोटी), बार्शिटाकळी तालुक्यतील भेंडीमहाल गाव येथील सौर प्रकल्प, क्षमता 10 मेगा वॅट, 33 के.व्ही. लोकार्पण समारंभ (45 कोटी), बार्शिटाकळी तालुक्यातील रेडवा गाव येथील सौर प्रकल्प, क्षमता 2 मेगा वॅट, 33 के. व्ही. लोकार्पण समारंभ (9 कोटी), एकूण रक्कम 2588.05 कोटी रूपये.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा