जप्त तारण मिळकतीबाबत दावे करण्याचे आवाहन

 

जप्त तारण मिळकतीबाबत दावे करण्याचे आवाहन

अकोला, दि. १२ : जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारी प्रकरणात जप्त केलेल्या तारण मालमत्तेबाबत संबंधित कर्जदार अथवा त्यांच्या संबंधितांकडून लेखी दावे मागविण्यात आले आहेत.

 जिल्ह्यात २७ मार्च रोजी धाडसत्रादरम्यान कारवाईत रमेश तुळशीराम कोल्हे, कौलखेड, गायत्री नगर, अकोला या ठिकाणी तारण असलेली मालमत्ता जप्त करण्यात आली. अवैध आणि विनापरवाना सावकारी करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यात ज्या कर्जदारांनी मिळकत ताबेगहाण ठेवली होती, त्या संबंधितांनी जिल्हा उपनिबंधक दि. २० जून रोजी कार्यालयातील कागदपत्रांची पाहणी करावी व दि. २३ जून ते २ जुलै या कालावधीत आवश्यक पुराव्यांसह लेखी स्वरूपात दावे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सहकार संकुल, आदर्श कॉलनी येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. अन्यथा मालमत्ता अधिनियमातील कलम १७(४) नुसार शासनाकडे जमा करण्यात येईल. संबंधित सर्वांनी वेळेत दावे सादर  करावेत, असे जिल्हा उपनिबंधकांनी कळविले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा