सहकारी पत संस्थांच्या २१२ कर्मचा-यांचे प्रशिक्षण

 

सहकारी पत संस्थांच्या २१२ कर्मचा-यांचे प्रशिक्षण

अकोला, दि. २३: महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने नागरी, ग्रामीण बिगरशेती व पतसंस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण नुकतेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडले.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे डॉ.प्रवीण एच लोखंडे अध्यक्षस्थानी होते. राज्य समन्वयक धनंजय डोईफोडे उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये थकित कर्जवसुली प्रक्रियेसाठी घ्यावयाच्या दक्षता व कायदेशीर तरतुदी याबाबत प्रकाश जाधव यांनी माहिती दिली. पतसंस्थांसाठी सुधारीत आर्थिक मापदंड, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे विविध तरतुदी, CRAR, CD रेशो, CRR SLR याबाबत आर. एस. बोडखे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

सायबर सेक्युरीटी लेटेस्ट फ्रॉडस्, डिजीटल अरेस्ट स्कॅमस, क्रिप्टो करेंसी, मनी लाँडरींग या बाबत संस्थांना येणाऱ्या संभाव्य अडचणी व त्याअनुषंगाने संस्थांनी घ्यावयाची दक्षता व अनुसरावयाची कार्यपद्धती, संशयास्पद व्यवहारांचा शोध घेणे, त्याची माहिती कळविणे, पतसंस्थांच्या कामकाजा बाबत (AI) कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर या विषयांवर सचिन वाणी यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व नागरी, ग्रामिण बिगरशेती सहकारी पत संस्था व पगारदार कर्मचाऱ्यांच्या सहकारी पत संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी असे एकूण २१२ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी सहाय्यक निबंधक ए. एस. शास्त्री, अभयकुमार कटके, डी. यु. शेकोकार, ज्योती मलिये, श्रीमती आर. आर. विटणकर आदी उपस्थित होते.

 

सदर प्रशिक्षणामध्ये उत्स्फुर्त सहभागाबद्दल सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट सोसा.लि. अकोला, व्यापारी नागरी सहकारी पत संस्था मर्या. तेल्हारा, श्रीहरी नागरी सहकारी पत संस्था मर्या. अकोला व क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले नागरी सहकारी पत संस्था म. अकोला या नागरी सहकारी पतसंस्थांचा प्रानिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा