अमृतसरोवराच्या काठावर योगदिन साजरा
आंतरराष्ट्रीय योगदिनाची दशकपूर्ती
अमृतसरोवराच्या काठावर योगदिन साजरा
अकोला, दि. 25 : आंतरराष्ट्रीय योगदिनाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जलसंधारण कार्यालयातर्फे जिल्ह्यातील ६ अमृत सरोवरांच्या काठावर योगदिन साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात योगदिन सोमवारी साजरा करण्यात आला. जलसंधारण कार्यालयातर्फे वणी रंभापूर, पाराभवानी, आखतवाडा, अंभोरा, तुलंगा (बु.) व पंचगव्हाण येथील सरोवरांच्या काठावर योग प्रात्यक्षिके करून योगदिन साजरा करण्यात आला. जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, योग प्रशिक्षक चंद्रकांत अवचार व अधिकारी, तसेच नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
योगाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठीच्या लाभाबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, ध्यानधारणा यांच्यासह विविध प्रात्यक्षिके करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा