दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अकोला, दि.१७: सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण
व समाज कल्याण विभागांतर्गत वर्ष २०२५ करीता दिव्यांग व्यक्तीच्या सशक्तीकरणासाठी उल्लेखनीय
आणि प्रेरक कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारासाठी नामांकन
मागविण्यात आले आहे.
इच्छूकांनी १५ जुलैपर्यंत आपले नामांकन विभागाच्या www.awards.gov.in संकेतस्थळावर करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी
राजश्री कोलखेडे यांनी केले आहे. वर्ष २०२५ करिता अर्ज केवळ राष्ट्रीय पुरस्कार संकेतस्थळावरच
ऑनलाईन सादर करावे. नामांकनामध्ये संकेतस्थळावर उपलब्ध प्रारुपात माहिती नमूद करावी.
त्यात आपल्या कार्याचा उल्लेख असावा. त्यासंबंधीचे दस्तऐवज जोडावेत.
अधिक माहिती विभागाच्या www.depwd.gov.in या संकेतस्थळावर मिळेल.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा