पालकमंत्र्यांनी घेतले संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन
अकोला, दि. ५ : संतनगरी शेगाव येथून पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखीचे राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज अकोला येथे दर्शन घेतले.
संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे पंढरपूर वारीसाठी यंदाचे ५६ वे वर्ष आहे. त्यानिमित्त पालखी आज अकोला मुक्कामी आहे. पालकमंत्री ॲड. फुंडकर यांनी हरीहरपेठेतील टाऊन शाळेमध्ये जाऊन श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. अकोला महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे पालखीनिमित्त आरोग्य पथक उपस्थित असून, तेथील पथकाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली.
000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा