ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधनासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत

 

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधनासाठी

अर्ज करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत

 

अकोला, दि. ३० : राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना कलावंत व साहित्यिकांसाठी राबविण्यात येते. पात्र व्यक्तींनी ३१ जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समाधान वाघ यांनी केले आहे.

पात्रतेनुसार, अर्जदाराचे वय ५० वर्षे (दिव्यांगांसाठी ४०) पूर्ण असावे, कला व साहित्य क्षेत्रातील योगदान किमान १५ वर्षे असावे. कलेच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण व दर्जेदार भर घातलेली असावी. केवळ कलेवर उपजिविका असलेली व्यक्ती पात्र असेल. केंद्र किंवा राज्याचे इतर पेन्शन किंवा इतर मार्गांनी उत्पन्न नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजारांपेक्षा जास्त  नसावे. महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

अर्जासह वृद्ध साहित्यिक, कलावंत पती-पत्नीचा एकत्रित पासपोर्ट सक्षम प्राधिका-याद्वारा साक्षांकित फोटो, जन्मतारखेचा दाखला, रहिवासी दाखला, आधार कार्ड, तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला, बँक तपशील, आजार, अपंगत्वाबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, परिचयपत्र, कलाक्षेत्रातील कार्याचा वर्षनिहाय पुरावा, पुरस्कार, प्रमाणपत्रे, कात्रणे आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अर्ज ३१ जुलैपूर्वी ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टलवर सादर करावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा