‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये ७३ उमेदवारांची प्राथमिक निवड






 

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’मध्ये

७३ उमेदवारांची प्राथमिक निवड

अकोला, दि. १७ : नोकरी इच्छूक उमेदवारांना खाजगी क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ आज घेण्यात आला. त्यात ७३ उमेदवारांची विविध पदांसाठी प्राथमिक निवड करण्यात आली.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांच्या नियोजनात रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हच्या उपक्रमांना गती देण्यात आली आहे. रोजगार मार्गदर्शन केंद्रात आज आयोजित उपक्रमात ३१३ उमेदवारांनी सहभाग घेतला. एकूण २०८ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व १०५ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन सहभाग घेतला. त्यात पाच उद्योग-आस्थापनांतील विविध पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्याद्वारे प्राथमिक स्तरावर ७३ उमेदवारांची निवड झाली.

जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांना नोकरी मिळावी यासाठी पुढेही प्लेसमेंट ड्राइव्हचे नियोजन असल्याची माहिती सहायक आयुक्त श्री. शेळके यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा