शोध व बचाव पथकाचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण
शोध व बचाव पथकाचे काटेपूर्णा
प्रकल्प येथे प्रशिक्षण
अकोला, दि. 3 : आपत्ती व्यवस्थापन
शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण काटेपूर्णा प्रकल्प महान येथे सोमवारी झाले. त्यात जिल्ह्यातील
विविध ठिकाणांवरील पथकांच्या सदस्यांनी भाग घेतला.
जिल्हधिकारी अजित कुंभार यांच्या
आदेशानुसार व निवासी उपजिल्हधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात व तहसीलदार बार्शिटाकळी
राजेश वजीरे , मूर्तिज़ापुर येथील नायब तहसीलदार रवींद्र राऊत यांचे उपस्थितीत प्रशिक्षण
झाले. मार्गदर्शक म्हणून राज्यआपत्ती प्रतिसाद पथक नागपुरचे मार्गदर्शन प्रशिक्षक
उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला अकोला,बार्शिटाकळी,पातुर,
बाळापुर,मुर्तिजापुर येथील तलाठी,पोलीस,होमगार्ड,अग्निशमन विभाग कर्मचारी, स्वयं सेवी संस्था प्रतिनिधी, आपदा मित्र उपस्थित होते. पूरस्थिती निवारण शोध व बचाव प्रथमोपचार,
फ्लोटिंग डिव्हाईस ,बोट प्रशिक्षण आदींची माहीती देण्यात आली. पुढील मान्सुन कालावधीच्या
अनुषंगाने विविध स्तरावरील घटक प्रशिक्षीत असावेत यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरले,
या प्रशिक्षणाला पोलीस निरीक्षक अमोल गोखले, एस एम गाडगे, आर, आर. मेहरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी
संदीप साबळे, सुनील कल्ले, हरिहर निमकांडे, प्रशांत सायरे, नितिन शिंदे , दीपक सदाफळे
संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर,उमेश आटोटे व वंदे मातरम आपत्कालीन पथक कुरणखेड,
रणजीत घोगरे व माँ चंडिका आपत्कालीन पथक पैलपाडा, वीर भगतसिंग पथक कुरणखेड़, सुशांत
आठवले, प्रफुल लकरस, दत्तू जुमड़े आदी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा