वसंतराव नाईक विजाभज महामंडळातर्फे आर्थिक दुर्बलांसाठी विविध योजना

 

 

वसंतराव नाईक विजाभज महामंडळातर्फे

आर्थिक दुर्बलांसाठी विविध योजना

 

अकोला, दि.१७: वसंतराव नाईक विजाभज महामंडळातर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एच. जी. आत्राम यांनी केले आहे.

वसंतराव नाईक वि. जा. भ. ज. विकास महामंडळ व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ या दोन उपकंपन्यांमार्फत वडार व रामोशी समाजातील लोकांकरिता स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कृषी संलग्न व्यवसाय, तांत्रिक व्यवसाय, पारंपारिक व्यवसाय, सेवा उद्योग सुरू करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना ऑनलाईन पद्धतीने राबवल्या जात आहेत. महामंडळाच्या vjnt.in या संकेतस्थळावर त्याचा तपशील पाहता येईल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 15 लाख रू. पर्यंत व गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत 50 लाख रू. पर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. दोन्ही योजनांमध्ये लाभार्थ्यांला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावे लागते त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्कम १२ टक्के पर्यंत लाभार्थीच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात येते.

त्याचप्रमाणे, बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंत ( बँक सहभाग ७५ टक्के व महामंडळ २५ टक्के) महामंडळाच्या २५ टक्के सहभागावर ४ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येतो.  तसेच थेट कर्ज योजनेत एक लाख रुपये पर्यंत व्याज नसलेले कर्ज पुरवठा करण्यात येतो. हे कार्यालय गोरक्षण रस्त्यावर पॉवर हाऊससमोर वैष्णवी कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर आहे. संपर्क दूरध्वनी (०७२४) २४५९९३७ आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा