जनावरांच्या वाहतुकीसाठी स्वास्थ्य तपासणी प्रमाणपत्र आवश्यक
जनावरांच्या वाहतुकीसाठी स्वास्थ्य तपासणी प्रमाणपत्र आवश्यक
अकोला, दि. ३ : जनावरांची वाहतूक करण्याआधी नजिकच्या पशुवैद्यकांकडून
जनावरांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे
वाहतूक प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी
अजित कुंभार यांनी दिले.
बकरी ईद सण येत्या ७ जून रोजी साजरा होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या
दालनात सोमवारी बैठक झाली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू असून या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी
पशुवैद्यकीय प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे. जिल्हा किंवा तालुका स्तरावरील पशुवैद्यकीय
दवाखान्यांमधून ही प्रमाणपत्रे मिळवावीत. वाहतूक करताना महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याचे
पालन व्हावे. कोणतीही अवैध कत्तल किंवा वाहतूक होऊ नये. तपासणीसाठी महसूल, पोलीस, परिवहन
व पशुसंवर्धन विभागाचे एकत्रित पथक स्थापन करावे आदी निर्देश बैठकीत देण्यात आले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा