कोविडः आरटीपीसीआर चाचण्यांत १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
अकोला दि.30(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 183 अहवाल प्राप्त झाले. त्यात अकरा जणांचा तर खाजगी प्रयोगशाळेतून एक असा एकूण १२ जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला , असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर (शा.वै.म. 11 व खाजगी एक )12+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह 12. आरटीपीसीआर ‘ 12 ’ आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात 11 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात सहा महिला व पाच पुरुष रुग्ण असून हे 10 रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून एक जण मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे . तर एका रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली. पाच ...