मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत
मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सुट्टी
अपवादात्मक परिस्थितीत दोन
तासांची सवलत
जिल्हा
दंडाधिका-यांचा आदेश
सहायक कामगार आयुक्तांचेही आवाहन
अकोला, दि. ११ : महाराष्ट्र
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व मतदारांना
मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना
मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व आस्थापनांनी कर्मचारी,
कामगारांना योग्य ती सुट्टी अथवा सवलत द्यावी, असा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित
कुंभार यांनी जारी केला.
लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ मधील कलम
१३५ (ब) नुसार, निवडणूक क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक
उपक्रम किंवा इतर आस्थापनांत काम करणाऱ्या आणि विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार
असलेल्या प्रत्येक व्यक्तीस मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. ही सुट्टी उद्योग
विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांसाठी लागू आहे. तसेच
पोटकलम (१) नुसार या सुट्टीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली
जाणार नाही.
उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या
सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनांनी या सूचनांचे काटेकोर
पालन करावे. मतदारांना मतदानासाठी सुट्टी अथवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न
आल्यास, संबंधितांवर
योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा दंडाधिकारी श्री. कुंभार यांनी नमूद केले आहे.
सहायक कामगार आयुक्तांनीही असे पत्र व आवाहन आस्थापनांना केले आहे.
0000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा