बाल हक्क सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

 

बाल हक्क सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा

अकोला, दि. 25 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, महिला व बालविकास विभाग व जिल्हयातील बाल संरक्षण यंत्रणेतर्फे जिल्ह्यात बाल हक्क सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

मतदार जनजागृती, बालकासंबंधीच्या कायद्यांबाबत जनजागृती कार्यक्रम, बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार आदी विषयांवर पथनाट्यांचे सादरीकरण,  वक्तृत्व स्पर्धा, रंगभरण स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले. समारोप गायत्री बालिकाश्रमात झाला. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बाल कल्याण समितीच्या अॅड. अनिता गुरव, राजेश देशमुख, डॉ. विनय दांदळे, अॅड. शीला तोष्णीवाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, गायत्री बालिकाश्रमाच्या संचालक मीराताई जोशी, शासकीय बालगृहाच्या जयश्री हिवराळे, अॅक्सेस टु जस्टीस संस्थेचे शंकर वाघमारे, चाईल्ड हेल्पलाईनच्या हर्षाली गजभिये व पद्माकर सदानशिव, विप्ला फाउंडेशनच्या अस्मिता धर्माळे आदी उपस्थित होते.

शासकीय बालगृह, सुर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह येथील बालकांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. वैशाली भटकर व नितीन अहीर यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री घाटे, प्रियांका ताले, रेश्मा गावंडे, उमेश पाटील यांनी परिश्रम घेतले.  जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाईन, रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, विप्ला फाउंडेशन, सुखाय फाउंडेशन, एन्करेज एज्युकेशन फाउंडेशन, शासकीय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, सुर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प अकोला सखी वन स्टॉप सेंटर आदींचे सहकार्य लाभले.

---

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :