मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीत बदल
मतमोजणीच्या दिवशी वाहतुकीत बदल
अकोला, दि. 21 : जिल्ह्यातील अकोला पश्चिम व अकोला पूर्व या विधानसभा
मतदारसंघातील मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होईल. यादिवशी
शहरातील वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. त्याबाबतचा
आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.
हा आदेश दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 5 वा. पासून रात्री 12 वाजेपर्यंत
लागू राहील. त्यानुसार सरकारी बगिच्याकडून जिल्हा रूग्णालयाकडे जाणारी व याच मार्गे
येणारी वाहतूक लक्झरी बसस्थानक, कारागृह चौक, अशोक वाटिका या मार्गे वळविण्यात येईल.
पंचायत समितीकडून जिल्हा रूग्णालयाकडे जाणारी वाहतूक पोलीस लॉनसमोरून अग्रसेनभवन, माहेश्वरीभवनमार्गे
वळविण्यात येईल. पंचायत समितीकडून सरकारी बगिच्याकडे जाणारी वाहतूक वसंत चित्रपटगृह,
खोलेश्वर चौक या रस्त्याने वळविण्यात येईल.
राजपूतपु-याकडून जिल्हा रूग्णालयाकडे जाणारी वाहतूक देवी पोलीस लाईन
मंदिर, नविन राधाकिसन प्लॉटकडून वळविण्यात येईल. राजपूतपु-याकडून सरकारी बगिच्याकडे
जाणारी वाहतूक खोलेश्वर चौक मार्गे वळविण्यात येईल.
हे आदेश सर्व जड वाहने, मालमोटारी, प्रवासी वाहने, ऑटोरिक्षा, दुचाकी
व इतर सर्व खासगी, सार्वजनिक वाहनांना लागू राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा