आयोगाकडून वेळ निर्धारित; मतमोजणी सकाळी 8 पासून सुरू होणार

 

आयोगाकडून वेळ निर्धारित;

मतमोजणी सकाळी 8 पासून सुरू होणार

अकोला, दि. 21 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 पासून सुरू होईल.

निवडणूक आयोगाकडून मतमोजणी सुरू करण्याची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. 28- अकोट मतदारसंघाचे मतमोजणी ठिकाण गोदाम क्रमांक 5, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती, पोपटखेड रोड, अकोट, त्याचप्रमाणे, 29-बाळापुर मतदारसंघाचे मतमोजणी स्थळ शासकीय धान्‍य गोदाम क्र.1, खामगाव रोड, बाळापूर येथे आहे.

30-अकोला (पश्चिम)आणि 31-अकोला (पूर्व) मतदारसंघाची मतमोजणी अनुक्रमे शासकीय धान्‍य गोदाम क्र.1 कक्ष क्र.3 आणि शासकीय धान्य गोदाम क्र.2 कक्ष क्रमांक 2 येथे होईल. 32-मुर्तिजापूर (अ.जा.) मतदारसंघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम क्र. 5, तहसिल कार्यालय परिसर, मुर्तिजापूर येथे होईल.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :