जात वैधतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

जात वैधतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अकोला, दि. 27 : जिल्ह्यातील 11वी व 12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव 31 डिसेंबरपूर्वी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या सहीशिक्क्यासह व महाविद्यालयाचे पत्र, तसेच बोनाफाईड प्रमाणपत्र व 15-अ नमुन्यातील अर्जासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. तत्काळ प्रस्ताव सादर करावेत जेणेकरून भविष्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक संस्थेत प्रवेशासाठी लागणारे प्रमाणपत्र विहित काळात देणे सोयीचे होईल, असे आवाहन समितीचे उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर यांनी केले आहे.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :