बालकांची बँक खाती आधार सिडींग करण्याचे आवाहन

 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना  

बालकांची बँक खाती आधार सिडींग करण्याचे आवाहन

अकोला, दि. 27 : महिला व बालविकास विभागामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेत लाभार्थ्यांना डिबीटीद्वारे लाभ दिला जातो. तरी सर्व योजनेच्या लाभार्थ्यांनी बालकांचे बँक खाते आधार सिडींग करून घ्यावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.

या योजनेचा लाभ प्राप्त होत असलेल्या ज्या बालकांचे वय १० वर्षाच्या आत आहे, त्या बालकांचे पालकांसोबत संयुक्त खाते उघडावे व सदर खात्याशी बालकांचा आधार क्रमांक सीडींग करावा तसेच ज्या बालकांचे वय १० वर्षा पेक्षा जास्त आहे. अशा बालकांचे स्वतंत्र बँक खाते उघडून आधार क्रमांक सिडींग करावा. बालकांचा आधार क्रमांक बँक खात्याशी सिडींग नसल्यास सदर योजनेचा लाभ जमा होणार नाही, याची नोंद लाभार्थ्याच्या पालकानी घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हाधीकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत,हिला माळा,अकोला येथे संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :