विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी माहिती द्यावी - जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार
विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन
अनुचित प्रकार आढळल्यास नागरिकांनी माहिती द्यावी
-
जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. 6 : निवडणूकविषयक
कुठलीही तक्रार अथवा निवडणूकविषयक कुठलाही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनात
आल्यास नागरिकांनी 24 x 7 उपलब्ध असलेल्या सी-व्हिजील
ॲप्लिकेशन व 1950 या टोल फ्री क्रमांकावर, तसेच, जिल्हा व मतदार
संघ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार नोंदवावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्याकडून
करण्यात आले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील 28-अकोट, 29-बाळापूर,
30- अकोला पश्चिम, 31- अकोला पूर्व व 32- मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघासाठी दि. 20
नोव्हेंबर रोजी सकाळी
7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे.निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचार संहितेचे पालन होणे आवश्यक
असून कुठल्याही प्रकारे आचार संहितेचा भंग होत असल्यास तसेच निवडणूकीच्या
अनुषंगाने काही अनुचीत प्रकार घडत असल्यास त्याबाबत तक्रार करण्यासाठी नियंत्रण
कक्ष आणि सी- व्हिजील ॲपचा वापर करता येईल.
अकोला जिल्ह्यातील नागरीकांच्या सुविधेसाठी 24 x 7 कालावधीकरीता जिल्हा स्तरावर तसेच
मतदार संघ स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा कार्यालयाचा संपर्क क्रमांक 1950 व 0724-2428200
असा आहे. अकोट
मतदारसंघासाठी 9420635467,
बाळापूरसाठी 9096148782, अकोला पश्चिमसाठी 0724-2404225,
अकोला पूर्वसाठी 0724-2435336 आणि मूर्तिजापूर मतदारसंघासाठी 07256-243473 असा संपर्क
क्रमांक आहे.
सी-
व्हिजीलचा वापर करा
कोणत्याही जागरुक नागरीकास तक्रार नोंदविता यावी याकरीता भारत
निवडणूक आयोगाकडून सी-व्हिजील
हे ॲप्लीकेशन तयार करण्यात आले आहे. त्याची लिंक खालीलप्रमाणे - https://play.google.com/store/apps/details?id=in.nic.eci.cvigil आणि https://apps.apple.com/in/app/cvigil/id1455719541.
सी-व्हिजील हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करुन कोणीही व्यक्ती निवडणूक
विषयक तक्रार सहज नोंदवू शकतो तसेच अशा नोंदविण्यात आलेल्या तक्रारीचे निराकरण
हे अवघ्या 100 मिनिटांच्या कालावधीत करण्यात येते.
निवडणूक कालावधीमध्ये निवडणूक
विषयक कुठलीही तक्रार नोंदवायची असल्यास अथवा निवडणूक विषयक कुठलाही अनुचीत
प्रकार घडत असल्याचे निदर्शनात आल्यास याबाबत नागरीकांनी 24 x 7
कालावधीकरीता उपलब्ध असलेल्या सी-व्हिजील ॲप्लीकेशन
व 1950 या टोल फ्री क्रमांकावर त्याचप्रमाणे जिल्हा व मतदार संघ स्तरावर स्थापन
करण्यात आलेल्या तक्रार निवारण कक्षातील वर नमुद दुरध्वनी/भ्रमणध्वनी
क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी व निवडणूक प्रक्रिया पारदर्शक/भयमुक्त वातावरणात
पार पाडण्याकरीता जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा
जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्याकडून करण्यात आले आहे.
*****
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा