उगवा येथे मतदार जाणीवजागृती

 


उगवा येथे मतदार जाणीवजागृती

अकोला, दि. 8 : महिला व बालविकास प्रकल्पातर्फे उगवा येथे मतदार जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला. त्याला महिलाभगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती सांगळे व पर्यवेक्षक श्रीमती मांडेकर, सर्व अंगणवाडी कार्यकर्ता व मदतनीस उपस्थित होत्या .

अंगणवाडीत दाखल बालकांच्या पालकांसह गावक-यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त हजेरी लावली. यावेळी मतदार जागृतीच्या घोषणा व मतदान करण्याची शपथही घेण्यात आली. गृहभेटीद्वारेही मतदार जाणीव जागृती करण्यात आली.

याचवेळी बालकांचे अन्नप्राशन व अर्धवर्षिक वाढदिवसही साजरा करण्यात आला. गरोदर माता नोंदणी करुन त्यांचे औक्षण करण्यात आले व पालकांना आहाराविषयीचे मार्गदर्शन करण्यात आले . आहार ,स्वच्छता,पूर्व शालेय शिक्षण, वजन व उंची मापन, पोषण ट्रॅकर आदीसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

०००

 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले