अकोला पश्चिममध्ये मतदान चिठ्ठ्यांच्या वितरणाचा आढावा.

 

 


 

अकोला पश्चिममध्ये मतदान चिठ्ठ्यांच्या वितरणाचा आढावा.

अकोला, दि. 15 : मतदारयादीतील नाव, अनुक्रमांक, केंद्र क्रमांक आदी माहिती मतदारांना सुलभपणे मिळावी यासाठी मतदान चिठ्ठ्या (व्होटरस्लीप) वितरित करण्यात येत आहेत. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन मतदान चिठ्ठ्यांच्या वितरणाचा आढावा घेतला.

 

 शहरातील कैलास टेकडी, हनुमान वस्ती व इतर परिसरात श्रीमती भालेराव यांनी पाहणी केली  व नागरिकांशी संवाद साधून मतदान चिठ्ठ्या मिळाल्या किंवा कसे, याची माहिती घेतली. त्यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व आशा सेविका यांच्यासोबत संवाद साधून वितरण कामासह विविध बाबींची माहीती घेतली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम