आई-बाबा दि. 20 नोव्हेंबरला मतदान अवश्य करा ‘किड्स पॅऱाडाईज’च्या विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र



 

आई-बाबा दि. 20 नोव्हेंबरला मतदान अवश्य करा

‘किड्स पॅऱाडाईज’च्या विद्यार्थ्यांचे पालकांना पत्र

 

अकोला, दि.१४ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आईबाबा, मतदानाचा आपले राष्ट्रीय कर्तव्य नक्की पूर्ण करा, असे पत्र पातूर येथील ‘किड्स पॅऱाडाईज’च्या विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांना लिहीले आहे.

अकोला जिल्ह्यातील पातूर येथे ‘स्वीप’अंतर्गत ‘किड्स पॅऱाडाईज’ शाळेच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला. त्यात सर्व मुलांनी सहभाग घेऊन आपल्या मातापित्यांना मतदानाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी आवाहन केले. मतदार जागृतीसाठी जिल्ह्यात अनेक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन