निरीक्षकांचे उपस्थितीत 'अकोला पूर्व'चे रँडमायझेशन पूर्ण
अकोला, दि. १० : अकोला पुर्व विधानसभा मतदार संघाकरिता मतदान यंत्रांचे व्दितीय यादूच्छीकीकरण (Randomization) निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या दालनात निवडणूक निरिक्षक गिरीशा पी.एस. आणि उमेदवार, प्रतिनिधी यांच्या उपस्थीतीत करण्यात आले.
निवडणूक निरिक्षक गिरिशा पि.एस. तसेच डॉ. शरद जावळे निवडणूक निर्णय अधिकारी ३१- अकोला पुर्व विधानसभा मतदार संघ अकोला व उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय तसेच राज्य राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समोर सदर पोर्टल लॉगिन करण्यात आले त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार पहिल्यांदा रॉन्डम बटण क्लिक करण्यात आले. त्यानंतर रॅन्डम करतांना सॉफ्टवेअरमध्ये उमेदवारांचा तपशील भरण्यात आला. नोटासह एकुण १२ उमेदवार असल्याचे दाखवण्यात आले. तसेच मतदार संघामध्ये एकुण ३५१ मतदान केंद्र असून आयोगाकडून एकुण ४१४ बि.यु. ४१४ सि.यु. व ४६८ व्ही. व्ही. पॅट उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार ते स्क्रीन वर दाखवण्यात आले. सदर रॅन्डम करताना एकुण तिन फेऱ्यांमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले. व तिस-या राऊंडनंतर शेवटची यादी ही डाऊनलोड करण्यात येणार असून त्यानुसार सदर मशीन हया मतदान केंद्रावर जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सिलींग करताना काही मशीन हया नादुरूस्त निघण्याची शक्यता असल्याने त्या मशीनचे नंबर हे बदलत असतात. त्याबाबत सदर उमेदवार यांना याबाबत माहिती देण्यात आली.
रॅन्डम झाल्यानंतर तिनही राऊंड मध्ये एक नंबरच्या मतदान केंद्रावर पहिल्या राऊंडला असलेली मशीन दूस-या राऊंड मध्ये कोणत्या मतदान केंद्रावर गेली व दुस-या राऊंड नंबर तिस-या राउंड मध्ये सदर मशीन कोणत्या मतदान केंद्रावर गेली याबाबत उमेदवारांचे प्रतिनिधी समोर प्रोजेक्टरवर प्रात्यक्षीक दाखविण्यात आले.
राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना ईव्हीएमच्या व्दितीय यादूच्छीकीकरण (2nd Randomization प्रकियेवर त्यांना कोणतीही शंका असल्यास मांडण्याचे सांगण्यात आले. कोणत्याही पक्षाने / प्रतिनिधी यांनी शंका उपस्थित न केल्यामुळे ईव्हीएमचे व्दितीय यादूच्छीकीकरण पोर्टलवर अंतिम करण्यात आले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा