‘एमपीएससी’ची रविवारी परीक्षा; केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
‘एमपीएससी’ची रविवारी परीक्षा;
केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
अकोला, दि. २७ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित नागरी
सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा जिल्ह्यात १३ उपकेंद्रांवर रविवार, दि.१ डिसेंबर रोजी
सकाळी १० ते १२ व दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. परीक्षा
केंद्र व परिसरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केंद्राच्या आतील व बाहेरील
१०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
करण्यात आले आहेत.
भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार जिल्हा दंडाधिकारी अजित
कुंभार यांनी हा आदेश निर्गमित केला. शहरातील खंडेलवाल ज्ञान मंदिर शाळा, स्कूल ऑफ
स्कॉलर्स,, शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जागृती विद्यालय, भारत विद्यालय,
भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, एल.आर.टी वाणिज्य महाविद्यालय भाग एक व दोन, दि नोएल इंग्रजी
शाळा, सीताबाई कला महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालय,
न्यू इंग्लिश हायस्कूल, सावित्रीबाई फुले जि.प. माध्यमिक कन्या शाळा आदी परीक्षा केंद्रांच्या
परिसरात परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पाचपेक्षा जास्त
व्यक्तींना एकत्ररित्या प्रवेश करता येणार नाही. घोषणा देता येणार नाहीत. शांततेस बाधा
निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता येणार नाही. १०० मिटर परिसरातील झेरॉक्स सेंटर,
पान पट्टी. लॅपटॉप, टायपिंग सेंटर, ध्वनिक्षेपक आदी परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात
येतील. अनधिकृत व्यक्तीस, वाहनास प्रवेश मनाई असेल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा