निवडणूक निरीक्षकांकडून विविध कामांचा आढावा

 




निवडणूक निरीक्षकांकडून विविध कामांचा आढावा

अकोला, दि. 15 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदानापूर्वीचे 72, 48 व 24 तास अत्यंत महत्वाचे असतात. त्या प्रत्येक टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम व सूचनांची जिल्ह्यात अंमलबजावणी होण्यासाठी सर्व जबाबदार यंत्रणांकडून काटेकोर कार्यवाही करावी, असे निर्देश विविध निवडणूक निरीक्षकांनी आज येथे दिले.

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक यंत्रणेची बैठक नियोजनभवनात झाली.  सामान्य निरीक्षक उदयन मिश्रा , अकोला पूर्व व अकोला पश्चिम मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक गिरीशा पी. एस., मूर्तिजापूर मतदारसंघाचे सामान्य निरीक्षक नरहरीसिंग बांगेर, पोलीस निरीक्षक अजित सिंह, खर्च निरीक्षक निशांत के., जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

पाचही मतदारसंघांतील 1 हजार 741 मतदान केंद्रांपैकी 1 हजार 108 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे. त्याद्वारे कंट्रोलरूममध्ये मतदान केंद्रांचे अवलोकन करता येणार आहे. त्यानुसार केंद्रांवर काही अडचणी आढळून आल्यास तत्काळ त्या दूर कराव्यात. केंद्रांवर सर्व सुविधा असाव्यात. वीजपुरवठा सुरळीत राहील याची खातरजमा करतानाच पर्यायी म्हणून जनरेटरचीही व्यवस्था व्हावी, असे निर्देश निरीक्षकांनी दिले.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुरेसा बंदोबस्त ठेवावा. पथकांनी अधिक सजग होऊन प्रत्येक बाब तपासावी. अपप्रकार रोखण्यासाठी कारवायांचे प्रमाण वाढवा, असेही निर्देश देण्यात आले. मतदान केंद्रांवरील सुविधा, विविध नोडल अधिका-यांनी केलेली कार्यवाही आदी अनेक बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम