बालगृहांत दीपोत्सव साजरा

 


बालगृहांत दीपोत्सव साजरा

 

अकोला, दि. 4 : महिला व बालविकास विभागाकडून विविध संस्थांच्या सहकार्याने शासकीय बालगृह व सुर्योदय बालगृहात दीपोत्सव साजरा करण्यात आला.   

बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्प लाईन, रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, असेस टुजस्टीस प्रकल्प, सुखाय फाउंडेशन, सुर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह यांचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.

बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड.संजय सेंगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव उपस्थित होते.  उपक्रमात बालगृहांच्या आवारात दिव्यांची आरास मांडण्यात आली. एक दिया देश के नाम या संकल्पनेतून बालकांनी दीप प्रज्ज्वलित केले.

सुर्योदय बालगृहात बालकांनी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती उभारली. बालकांना सुगंधी उटणे लावुन सुवासिक साबणाने त्यांना अभ्यंगस्नान घालण्यात आले. त्यानंतर बालकांचे औक्षण करण्यात आले. त्यांना फटाके वितरित करण्यात आले. बालगृहातील बालकांना टॉवेल्स व ब्लँकेटसचे वितरणही करण्यात आले. शिवराज पाटील, उमेश पाटील,  शंकर वाघमारे, अॅड. शीला तोष्णीवाल, राजेश देशमुख, ॲड. सारिका घिरणीकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर, अस्मिता धर्माळे, शुभांगी लाहुडकर, हर्षाली गजभीये, पद्माकर सदाशिव, संजय मोते, अनिल इंगोले, राजेश अंभोरे आदी उपस्थित होते. शरयु तळेगावकर, वैभव भदे, राजेश मनवर, स्वप्नील शिरसाट, निलेश पेशवे, प्रशांत देशमुख, सपना खंडारे, दिनेश लोहोकार, रेखा बावणे, सुनील लाडुलकर, सचिन घाटे, सतिश राठोड, सुनील सरकटे यांनी परिश्रम घेतले.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले