अनाथ प्रमाणपत्रासाठी संबंधितांनी अर्ज करावा - महिला व बालविकास विभागाचे आवाहन

 अनाथ प्रमाणपत्रासाठी संबंधितांनी अर्ज करावा

-        महिला व बालविकास विभागाचे आवाहन

 

अकोला, दि. 14 : महिला व बालविकास विभागातर्फे साथी अभियानाद्वारे अनाथ बालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी सांभाळकर्ते व संबंधितांनी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.

ज्या बालकांच्या आई व वडलांचा मृत्यू त्या बालकांचे वय १८ वर्ष पूर्ण होण्याआधी झाला असेल अशी बालके अर्ज करू शकतात. त्यासाठी आई व वडलांच्या मृत्यूचा दाखला, बालकाचे आधारपत्र, सांभाळकर्त्यांचे आधारपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, शिधापत्रिका, शाळा निर्गम उतारा, शाळेची टीसी किंवा बोनाफाईड दाखला ही सर्व कागदपत्रे तीन प्रतींमध्ये स्वसाक्षांकित करून महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले. अधिक माहितीसाठी ९४२२०६४२४७ वर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले