निवृत्तीधारकांनी हयातीचा दाखला देण्याचे कोषागाराचे आवाहन

निवृत्तीधारकांनी हयातीचा दाखला देण्याचे कोषागाराचे आवाहन

अकोला, दि. 7 : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणारे सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी निवृत्तीवेतन अदा होत असलेल्या बँकेत जाऊन विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी, असे आवाहन जिल्हा कोषागारातर्फे करण्यात आले आहे.

 

कोषागाराकडून संबंधित बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र यादी उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर, सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी उपलब्ध केलेल्या यादीत आधारकार्ड क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. त्याशिवाय, डिसेंबर महिन्याचे निवृत्तीवेतन काढता येणार नाही.

 

तसेच, करपात्र उत्पन्न असणा-या निवृत्तीवेतनधारकांना जुन्या करप्रणालीप्रमाणे प्राप्तीकराची गणना करावयाची असल्यास तसा अर्ज कोषागार कार्यालयात द्यावा. अन्यथा नवीन करप्रणालीप्रमाणे प्राप्तीकर कापला जाईल.

 

त्याचप्रमाणे, 80 वर्षे व त्यावरील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनात 20 टक्के  किंवा अधिक वाढ मिळाली नसल्यास त्यांनी तत्काळ जन्म दाखला, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते असलेल्या शाखा प्रमुखांचे प्रमाणपत्र, शासकीय/निमशासकीय आस्थापनेचे प्रमाणपत्र, सेवापुस्तकातील नोंद ओळखपत्र, सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना, भारतीय जीवन विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांचे कडील पॉलिसी  यापैकी एक पुरावा तसेच बँक पासबुकाची झेरॉक्स कोषागारात सादर करावी.

निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी तसेच कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोषागार अधिकारी मा. ब. झुंजारे यांनी केले आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले