निवडणूक कार्याच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांकडून पाहणी व मतदार संवाद
अकोला, दि. 13 : जिल्ह्यात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सातत्याने जनजागृती करण्यात येत असून, घरभेटीही देण्यात येत आहेत. याच अंतर्गत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनीही आज मोठी उमरी परिसरात भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणूकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी जनजागृती व प्रयत्न होत आहेत. गत निवडणूकीत कमी मतदान झालेल्या परिसरात लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, मोठ्या प्रमाणावर जागृतीपर स्टीकर व पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, ठिकठिकाणी व घरोघर लावण्यात येत आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनीही मोठी उमरी, विठ्ठलनगर येथे अनेक ठिकाणी भेट देऊन मतदारांशी संवाद साधला व मतदानाबाबत आवाहन केले. मतदारांना मतदार चिठ्ठ्या मिळत आहेत किंवा कसे, याचीही तपासणी त्यांनी केली.
यावेळी जिल्हाधिका-यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व आशा वर्कर यांच्याशीही संवाद साधून विविध बाबींची माहिती घेतली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा