वायुप्रदूषणामुळे होणारे आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी - जि. प. आरोग्य यंत्रणेची सूचना
वायुप्रदूषणामुळे होणारे आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी
-
जि. प. आरोग्य यंत्रणेची सूचना
अकोला, दि. 7 : हिवाळा, बदलते हवामान व सणासुदीच्या काळात वायुगुणवत्तेवर
होणारा परिणाम यामुळे विविध आजार उद्भवू शकतात. या काळात आरोग्याची काळजी घेण्याची
सूचना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी व आरोग्य यंत्रणेने केली आहे.
वाढती वाहने, कारखाने, वीज, सिंमेटनिर्मिती प्रकल्प, घनकचरा, सांडपाणी,
रासायनिक खते आदी अनेक स्तोत्रांमुळे प्रदूषण उद्भवू शकते. वायु प्रदुषणाने खोकला,
घरघर, छातीत अस्वस्थता, जंतुसंसर्ग, दमा असे आजार उद्भवतात. त्यात पाच वर्षांखालील
मुले, गर्भवती महिला, दुर्धर आजारी व्यक्ती, गरीब कुटुंबे, वाहतूक पोलीस, स्वयंसेवक,
बांधकाम कामगार, रिक्षाचालक, सफाई कामगार आदी अतिजोखमीचे घटक असतात.
हे आजार टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नये. मास्कचा
वापर करावा. शुद्ध हवेत चालावे. बंद आवारात डासाची कॉईल लावणे टाळावे. घर झाडून साफ
करण्याऐवजी ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. फळभाज्यांचे
सेवन करावे. भरपूर पाणी प्यावे.लाकूड, पिकाचे अवशेष, कचरा उघड्याव जाळू नये. वाहतुकीसाठी
सार्वजनिक सेवा वापरावी. सायकलचा वापर करावा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.
बळीराम गाढवे केल्या आहेत.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा