विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरमध्ये करिअर मार्गदर्शन मेळावा - जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी
विद्यार्थ्यांसाठी डिसेंबरमध्ये करिअर
मार्गदर्शन मेळावा
-
जि. प. मुख्य
कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी
अकोला, दि. 29 : जागतिक बँक पुरस्कृत स्टार प्रकल्प
व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या
विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात आयोजित करण्यात
येईल, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी सांगितले.
इयत्ता नववी ते बारावीच्या
विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडी, क्षमता, व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये याबाबत
जाणीव निर्माण करण्याबाबत समुपदेशक व तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्याला आपल्या क्षमता कळून नोकरी व व्यवसायाची निवड निवड करण्यास
मदत होईल.
डिसेंबरमध्ये दुस-या आठवड्यात
मेळावा घेण्याचे नियोजन असून, मेळाव्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांना
मार्गदर्शन, तसेच दुस-या दिवशी जिल्ह्यातील नियोक्त्यांमार्फत व्यवसाय
नियुक्तीसंदर्भात मुलाखती व नियुक्ती देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्व यंत्रणांनी
समन्वयाने काम करून मेळावा यशस्वी करण्याचे निर्देश श्रीमती वैष्णवी यांनी दिले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा