गुन्ह्यांची माहिती प्रसिद्धी करणे उमेदवारांना बंधनकारक

 

गुन्ह्यांची माहिती प्रसिद्धी करणे उमेदवारांना बंधनकारक

अकोला, दि. 4 : विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांवर दाखल गुन्ह्यांची माहिती  निवडणूक काळात तीनवेळा प्रसिद्ध करणे उमेदवारांना बंधनकारक करण्यात आले आहे.

त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांनाही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे.  

उमेदवारांवर गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत व त्यांची सद्य:स्थिती काय हे माहिती असणे हा मतदारांचा अधिकार आहे. त्यामुळे उमेदवारांना, तसेच ते ज्या पक्षाकडून उमेदवारी करणार आहेत त्या पक्षांना संबंधित उमेदवाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने विहित केलेल्या शपथपत्रातील नमुन्यात प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची परिपूर्ण माहिती ठळकपणे देणे उमेदवारांवर बंधनकारक करण्यात आले आहे. उमेदवार आणि संबंधित पक्षांनाही प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीला वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॅानिक मीडियाद्वारे प्रसिद्धी द्यावी लागणार आहे. ही प्रसिद्धी निवडणूक कालावधीत तीन वेळा द्यावयाची आहे. 

 प्रथम प्रसिद्धी उमेदवारी अर्ज माघारीच्या तारखेपासून पहिल्या चार दिवसांत, दुसरी प्रसिद्धी यापुढील पाच ते आठ दिवसांत करणे आवश्यक आणि तिसरी प्रसिद्धी नवव्या दिवसापासून प्रचाराच्या अखेरच्या दिवसांपर्यंत करता येईल
 
 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम