दिव्यांग मतदारांसाठी रिक्षाची सुविधा

 

दिव्यांग मतदारांसाठी रिक्षाची सुविधा

अकोला, दि. 14 : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी ऑटोरिक्षाची सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी आवश्यक असल्यास ऑटोरिक्षाची सुविधा देण्यात येणार आहे. सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी सक्षम ॲपवर मागणी नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधितांना रिक्षा उपलब्ध करून दिली जाईल. दिव्यांग बांधवांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व मतदान अवश्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :