बालदिनी मतदार जागृती बाईक रॅली
बालदिनी मतदार जागृती बाईक रॅली
अकोला, दि. 13 : बाल संरक्षण यंत्रणा व विधी सेवा प्राधिकरणातर्फे बाल हक्क सप्ताहानिमित्त उद्या दि. 14 नोव्हेंबर रोजी बालक हक्क व मतदार जागृतीसाठी बाईक रॅली जिल्हाधिकारी कार्यालयातून स. 10.30 वा. काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिका-यांसह विविध मान्यवर रॅली शुभारंभप्रसंगी उपस्थित राहतील, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, बालक हक्क सप्ताहानिमित्त विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यात दि.१४ नोव्हेंबर रोजी रॅली, दि. १५ नोव्हेंबर रोजी बालक हक्क कायदा जनजागृती उपक्रम व पथनाट्य सादरीकरण, दि.१६ नोव्हेंबरला बालविवाह तथा बालकांचे विवीध समस्यांबाबत पथनाट्य, दि. १७ नोव्हेंबर रोजी शासकीय बालगृह येथे एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, दि.१८ नोव्हेंबर रोजी सुखाय फाउंडेशनच्या वतीने बालगृहातील बालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, दि.१९ नोव्हें. रोजी बालगृहातील बालकांची आरोग्य तपासणी, दि.२० नोव्हें.ला बालगृहातील बालकांना माहितीपटाद्वारे मार्गदर्शन, दि. २१ नोव्हें. रोजी शासकीय बालगृह येथे सांस्कृतीक कार्यक्रमाने सप्ताहाचा समारोप करण्यात येईल. बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड हेल्पलाइन व रेल्वे चाइल्ड हेल्पलाईन, सखी वन स्टॉप सेंटर, शासकीय बालगृह, महिला राज्यगृह, प्रेरणा स्वाधार गृह, गायत्री बालिकाश्रम, सुर्योदय बालगृह, उत्कर्ष शिशुगृह, एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशन, सुखाय फाउंडेशन, अॅसीस टु जस्टीस प्रकल्प आदी संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा