मतदार जागृती बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदार जागृती बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
अकोला, दि. 14 : विधानसभा निवडणुकीत मतदार जागृतीसाठी विधी सेवा प्राधिकरण
व बाल संरक्षण यंत्रणेने आज शहरात काढलेल्या रॅलीला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळाला.
बाल हक्क सप्ताहानिमित्त बाल हक्कांबाबत जाणीवजागृती आणि विधानसभा निवडणूकीनिमित्त
मतदार जागृतीसाठी या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते मतदार जागृती संदेशाचा फलक उंचावून रॅलीचा
शुभारंभ करण्यात आला.
गत निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण कमी होते. ते वाढविण्यासाठी
घरोघर पोहोचून भरीव जनजागृती करावी. लोकशाहीचा बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा
हक्क बजावणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी यावेळी केले. रॅलीत
मतदार जागृती संदेशाचे फलक घेऊन विविध अधिकारी, कर्मचारी, नागरिक, स्वयंसेवक, महिला,
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आपापल्या वाहनांसह सहभागी झाले होते. यावेळी पथनाट्यातूनही मतदानाचे महत्व, मतदाराचे कर्तव्य
व हक्क, बालहक्क याबाबत माहिती देण्यात आली.
‘स्वीप’च्या नोडल अधिकारी वैष्णवी
बी., बाल हक्क आयोगाचे सदस्य ॲड.संजय सेंगर, बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष अनिता गुरव,
महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे, महिला व बालकल्याण अधिकारी
गिरीश पुसतकर, राजू लाडुलकर यांच्यासह बाल संरक्षण यंत्रणा व विधी सेवा प्राधिकरणाचे
अधिकारी आदी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा