शिष्यवृत्ती अर्जांची पूर्तता करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना

 शिष्यवृत्ती  अर्जांची पूर्तता करण्याबाबत महाविद्यालयांना सूचना

 अकोला, दि. 13 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठयक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहे.

        शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता महाडीबीटी पोर्टलवरून विविध मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे नवीन (Fresh) व नुतनीकरण (Renewal)च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती दि.25 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात आलेली असून देखील मागील वर्षाच्या तुलनेत आजपर्यंत झालेल्या अर्ज नोंदणीचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्हयातील विविध महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षास व नुतनीकरणास प्रवेशित असलेल्या उक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे https://mahadbtmahait.gov.in या महाडीबीटी संकेत स्थळावर अर्ज नोंदणीकृत करण्याची तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.

सन 2023-24  या शैक्षणिक वर्षाचे महाडीबीटी पोर्टलवरील डॅशबोर्डच्या सद्यस्थितीचे अवलोकन केले असता अद्यापही महाविद्यालय स्तरावर उपरोक्त योजनेचे अनुसूचित जाती प्रवर्गातील (633), तर विद्यार्थी स्तरावर (991) अर्ज अद्यापही प्रलंबित असल्याचे दिसून येते. याबाबत यापूर्वी या कार्यालयाकडून आपणास वारंवार अवगत करून देण्यात आलेले आहे. तरी सुध्दा महाविद्यालय व विद्यार्थीस्तरावर प्रलंबित अर्ज दिसून येत आहेत.  

       सन 2024-25 या सत्रातील अर्जाचे प्रमाण सरासरीच्या तुलनेत अत्यल्प न राहता आपले महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाडीबीटी संकेत स्थळावर भरून घेण्याची तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. महाविद्यालयीन फलकावर तशा सूचना /कार्यशाळा घेऊन सर्व संबंधित विद्यार्थ्यांना देण्यात याव्यात. जेणेकरून पात्र मागासवर्गीय विद्यार्थी महाडिबिटी प्रणालीवर आवेदनपत्रे भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित प्राचार्य यांनी घ्यावी. सन 2023-24 व त्यापूर्वीचे अर्ज महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे विहित मुदतीत निकाली न काढल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी योजनेचे प्रथम अंमलबजावणी अधिकारी म्हणून संबंधित प्राचार्य जबाबदार राहील. असे आवाहन डॉ.अनिता राठोड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अकोला यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले