निरीक्षकांकडून गृह मतदानाची पाहणी

 



अकोला, दि. १० : ८५ वर्षावरील मतदार व दिव्यांग मतदार यांना त्यांच्या स्वतःच्या घरुन मतदान करण्याबाबतची सुविधा देण्याबाबत अकोला पूर्व विधानसभा मतदार संघात २९ मतदान पथके व ४ राखीव मतदान पथके अशी एकूण ३३ मतदान पथके तयार करण्यात आली आहेत.  निवडणुक निरिक्षक गिरिशा पी.एस. यांच्या पथकाने आज गृह मतदार प्रक्रियेची पाहणी केली.

मतदान हे नि:पक्षपाती व नियमाप्रमाणे होईल यासाठी सर्व पथकांना प्रत्यक्ष सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे.  पथकामध्ये मतदान अधिकारीसह इतर दोन व एक मायक्रो ऑब्झर्वहर व पोलीस असे एकुण ५ लोकांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ८५ वर्षावरील एकुण ५६४ मतदार व दिव्यांग एकुण २०० मतदार असे एकुण ७६४ मतदार आहे. त्यापैकी एकुण ७२१ एवढ्या मतदारांनी होम व्होटिंगचा लाभ घेतला आहे. यानुसार अकोला पुर्व विधानसभा मतदार संघामध्ये एकुण ९४ टक्के होम वोटींग झाले आहे. याबाबत  निवडणुक निरिक्षक गिरिशा पी.एस. व निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या उपस्थीतीमध्ये मतदान अधिकारी श्री. सवडतकर  यांचे पथकाने अंबिकानगर येथील श्रीमती मनकर्णा देवमण राऊत (वय वर्ष १०७)  यांनी प्रत्यक्ष गृह मतदान सुविधेचा लाभ घेतला. त्याप्रसंगी निवडणुक निरीक्षक यांनी  पथकाचे कामाबदद्ल समाधान व्यक्त केले. गृह मतदान  १०० टक्के यशस्वी करण्याबाबत आशावाद व्यक्त केला.  पथकासोबत  स्वीप नोडल अधिकारी मनोज बोपटे

तसेच पर्यवेक्षक श्री. कुरई हजर होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले