मतदानाच्या व त्याआधीच्या दिवशी मुद्रित माध्यमांतील जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक

 

मतदानाच्या व त्याआधीच्या दिवशी

मुद्रित माध्यमांतील जाहिरातींचे प्रमाणीकरण आवश्यक  

 

            अकोला, दि. 15 : कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी वृत्तपत्रात राजकीय जाहिरात करावयाची असल्यास जाहिरातीचा मजकूर जिल्हा माध्यम प्रमाणीकरण संनियंत्रण समितीकडून  (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे.

          विधानसभा निवडणूकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार दि. 19 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणा-या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणीकरणासाठी समितीकडे दोन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणीकरणाचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात दैनिके, मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. 

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन