विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक राजकीय पक्षांना विविध विषयांवर सूचना




 

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024  

जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेत बैठक

राजकीय पक्षांना विविध विषयांवर सूचना

अकोला, दि. 11 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर दिलेल्या सूचना व तरतुदींची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षांच्‍या अध्‍यक्षांची सभा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांच्या अध्‍यक्षतेत आज झाली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, तसेच विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सभेत उपस्थितांना व्होटर स्लीप वितरणाबाबत, तसेच ईव्हीएम कमिशनिंग, टपाली मतपत्रिका सुविधा केंद्र, 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग आदी माहिती देण्यात आली. अंतिम करण्‍यात आलेल्‍या मतदार याद्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत मान्‍यताप्राप्‍त राजकीय पक्षांच्‍या उमेदवारांना विनामुल्‍य तसेच इतर उमेदवारांना सशुल्‍क उपलब्‍ध आहेत. प्रत्‍येक मतदार संघाकरिता मतमोजणीसाठी मतदान यंत्र, टपाली मतपत्रिकेच्‍या निश्चित करण्‍यात आलेल्‍या टेबलच्‍या संख्‍येइतके उमेदवार प्रतिनिधी नियुक्‍त करता येतील, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिली.

त्याचप्रमाणे, 17 सी  भाग - 1 नोंदविलेल्‍या मतांचा हिशेबाची प्रत मतदानाच्या दिवशी संबंधित मतदान केंद्राध्‍यक्षांकडून मतदान प्रतिनिधी यांना प्राप्‍त करुन घेण्‍याबाबत सांगावे व मतमोजणीच्‍या दिवशी त्‍यावरुन मतदान यंत्रांची तसेच मतदानाची खात्री करावी, असे यावेळी सर्वांना सांगण्यात आले.

मतमोजणी झाल्‍यानंतर अकोला जिल्‍ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांतील मतदान यंत्रे पुढील 45 दिवस  जिल्‍हा स्‍तरावर तयार करण्‍यात आलेल्‍या सुरक्षा कक्षामध्‍ये ठेवण्‍यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, सुरक्षा कक्षाच्‍या बाहेर नेमून दिलेल्‍या ठिकाणी 24 तास उमेदवार त्‍यांच्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहून सीसीटीव्ही डिस्प्लेवर सुरक्षा कक्षाच्‍या सीलचे निरीक्षण करु शकतात.

सर्व मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात शासकीय धान्‍य गोदाम येथील जिल्‍हास्‍तरीय सुरक्षा कक्षात ठेवणेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारे पोलीस बंदोबस्तात आणण्यात येतील. या वाहनांना फॉलो करता येईल, तसेच उपस्थित राहून संपुर्ण प्रक्रियेचे निरीक्षण करून सील लावू शकता, अशी माहिती सर्वांना देण्यात आली.

पाचही मतदारसंघांसाठी नियुक्त सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरिक्षक यांच्याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक मतदारसंघ स्तरावरही याचप्रकारे बैठकीद्वारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले