निवडणूक निरीक्षकांकडून विविध कक्षांची पाहणी






 

निवडणूक निरीक्षकांकडून विविध कक्षांची पाहणी

अकोला, दि. 4 :  निवडणूक निरीक्षक गिरीशा पी. एस. यांनी आज जिल्हा निवडणूक कार्यालयातील, तसेच निवडणूक निर्णय कार्यालयांतील विविध कक्षांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.

अकोला पूर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, आचारसंहिता कक्ष, साहित्य कक्ष, परवानगी कक्ष, तक्रार निवारण कक्ष, तसेच जिल्हा निवडणूक कार्यालयातील निवडणूक कक्ष, माध्यम संनियंत्रण कक्ष आदी विविध कक्षांची पाहणी निरीक्षकांनी केली. यावेळी त्यांनी निवडणूकविषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तरतुदीचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

निवडणूकीच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, नोंदी रजिस्टर आदी बाबींची तपासणी निरीक्षकांनी केली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार सुरेश कव्हळे व विविध अधिकारी उपस्थित होते.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले