दिव्यांग रॅलीद्वारे मतदार जागृती




दिव्यांग रॅलीद्वारे मतदार जागृती

अकोला, दि. 7 :  जिल्हा प्रशासन, स्वीप समिती व दिव्यांग मदत कक्षातर्फे मतदार जागृतीसाठी दिव्यांग बांधवांची रॅली काढण्यात आली.

जिल्हा परिषद परिसरातून रॅलीचा सुरूवात झाली. पुढे वसंत चित्रपटगृह, जुने पोलीस अधिक्षक कार्यालय व पुन्हा जि. प. दिव्यांग कल्याण कक्ष असा रॅलीचा मार्ग होता. दिव्यांग कलावंत प्रकाश अवचार, शाहीर पुरूषोत्तम गवई, शाहीर गौतम अंभोरे, गणेश वाकोडे त्यांच्या सहका-यांनी रॅलीत विविध गाणी सादर केली. उपस्थित सर्वांना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली.

दिव्यांग मतदारांना मतदान करण्याविषयी जागृती करण्यासाठी, तसेच दिव्यांग मतदारांचे संपूर्ण मतदान होण्यासाठी रॅलीचा माध्यमातून प्रयत्न होत आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात अनेक कार्यक्रम घेतले जात आहेत.

दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी दिगंबर लोखंडे, अधिकारी हरिनारायणसिंह परिहार, सुमेध चक्रनारायण, सुनील बोंगीरवार, मंगेश ठाकरे, राजश्री कोलखेडे, माया शिर्के, पौर्णिमा घटाळे, शैलेश बगाटे, संजय बरडे, मोहम्मद अजीज, श्रीकांत देशमुख, दिलीप सरदार, दत्ता चिंचोळकर, ज्ञानबा केंद्रे, नागेश खांडेकर, शालिनी इंगळे, योगेश बोदडे, महादेव इंगोले, राजेंद्र भोबडे, विजय धाडवे आदी उपस्थित होते.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले