युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी अर्ज मागविले

युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी अर्ज मागविले

अकोला, दि. 5 : क्रीडा विभागातर्फे दि. 13 व 14 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी युवकांनी दि. 8 नोव्हेंबरपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात, तसेच माय भारत पोर्टल अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

‘विज्ञान व तंत्रज्ञानातील नवसंकल्पना’ ही यंदा महोत्सवाची थीम आहे. महोत्सव वसंत देसाई क्रीडांगण येथे होईल. त्यातील स्पर्धांमध्ये 15 ते 29 वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादरीकरण स्पर्धा, तसेच समूह लोकनृत्य, लोकगीत वैयक्तिक लोकनृत्य, वैयक्तिक लोकगीत, कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व, कविता, हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रॉडक्ट आदी बाबींसाठी स्पर्धा होईल.

समूह लोकनृत्याला 15 मिनीटे व वैयक्तिक लोकनृत्याला 7 मिनीटे सादरीकरण अवधी आहे. कथालेखनाची शब्द मर्यादा एक हजार शब्द आहे. कविता स्वरचित व 500 शब्दमर्यादेत असावी. चित्रकला स्पर्धा प्रत्येक स्पर्धकाला एक पोस्टर सादर करता येईल. वक्तृत्व स्पर्धेत बोलण्याचा अवधी 3 मिनीटे आहे. अधिक माहितीसाठी (0724) 2437653 वर संपर्क करावा. ई-मेल आयडी akoladso@gmail.com आहे.

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा